फैजपूरात बंद घरातून सव्वा लाखांचा ऐवज लांबवला
बंद घर फोडत चोरट्यांचा सव्वा लाखांचा ऐवजावर डल्ला : फैजपूरातील घटना
फैजपूर : शहरातील श्रीकृष्ण कॉलनी भागात चोरट्यांनी बंद घर फोडून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी चेतन अरुण तळेले हे शनिवारी संध्याकाळी आपल्या मूळ गावी खिरोदा येथे गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत बंद घरातील गोदरेज कपाटातून एक लाख 19 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व 20 हजार रुपये रोकड लांबवली.
चोर्यांमुळे नागरीक धास्तावले
तळेले रविवारी घरी आल्यानंतर घरफोडी उघडकीस आली. श्वान पथकाला पाचारण करताच श्वानाने आमोदा रस्त्यापर्यंत माग दाखवला. याबाबत फैजपूर पोलिसात तळेले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार उमेश चौधरी, रवींद्र मोरे, ज्ञानेश्वर पवार करीत आहेत.