फैजपूरात रामनवमीनिमित्त गोर-गरीबांना अन्नदान

0

भाविकांची गर्दी न जमवता मंदिरात पूजार्‍यांनी केले पूजन

फैजपूर : गावातील मंदिरातच पुजार्‍यांनी रामनवमी साजरी केली तसेच फैजपूरातील सार्वजानिक रामनवमी उत्सव समितीने गावातील हातावर पोटभरणार्‍या कुटुंबांना गुरुवारी दिले गुरुवारी सकाळी व संध्याकाळी जेवण दिले. कोरोनामुळे नागरीकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, तोंडाला मास्क लावा असा सूचनांचे पालन नागरीकांनी करावे, असा शासनाचा आदेश आहे. गावातील मंदिरे सुद्धा बंद आहेत. गुरुवारी भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस दुपारी 12 वाजता फैजपूर गावातील मंदिरात पुजार्‍यांनी मंदिरातच गर्दी न करता रामनवमी साजरी केल.

विविध ठिकाणी केले अन्नदान
गावातील सार्वजनिक रामनवमी साजरी करण्यार्‍या समितीने गावातील हातावर पोट भरणारे कुटुंब, बाहेरगावी पायदळ जाणारे येणारे कुटुंब, मरी माता मंदिर जवळीक कुटुंब, रवी कोळी यांचे ग्यारेज समोरील कुटुंब, मनोहर पाटील यांचे शेतात, गुरुदेव कॉम्प्लेक्स समोरील, छत्री चौकातील, गावातील गरजू कुटुंब यांना सकाळ व संध्याकाळी गुरुवारी रामनवमी या दिवशी अन्नदान करून प्रभू रामचंद्र यांच्या विचारांनी गरिबांना अन्नदान करून साजरी केली. अन्नदान कार्यक्रमासाठी निरज झोपे, सोनू ठाकरे, रितेश चौधरी, लोकेश कोल्हे, प्रतीक वारके यांनी परीश्रम घेतले.