दाढी नदीच्या पुलाचे लवकरच काम -आमदार हरीभाऊ जावळे
फैजपूर- यावल वन विभाग, जळगाव वनपरीक्षेत्र अधिकारी, यावल पूर्व राज्य कॅम्पा योजनेंतर्गत फैजपूर येथील फॉरेस्ट डेपोमध्ये वनकर्मचारी निवास व चैन लिंग कुंपणाचे भूमिपूजन रावेर विधानसभा क्षेत्रचे आमदार हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आमदार जावळे म्हणाले की, वनविभागाच्या या जमिनीवर विकास कार्य होत असून पहिल्या टप्प्यात वनकर्मचारी निवास व कंपाऊंडचे सुमारे 38 लक्ष रुपये खर्चाच्या कामाचे भूमिपूजन झाले असून शहरातील दाढी नदी पुलाच्या कामासाठी आठ कोटी रुपये निधी मंजूर झाला असून लवकर कामाला सुरुवात होईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यांची होती प्रमुख उपस्थिती
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा महानंदा होले, उपवनसंरक्षक यावल वनविभाग प्रकाश मोरणकर, उपविभागीय अधिकारी डॉ.अजित थोरबोले, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा प्रमुख हर्षल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिराभाऊ चौधरी, माजी नगराध्यक्ष बी.के.चौधरी, पी.के.चौधरी, निलेश राणे, यावल तालुका शेतकी संघ व्हा.चेअरमन नितीन नेमाडे, जिल्हा दुध संचालक जगदीश बढे, अनिल नारखेडे, भाजपा शहराध्यक्ष संजय रल, सरचिटणीस संजय सराफ, उपाध्यक्ष अनंता नेहेते, कोषाध्यक्ष रघुनाथ कुंभार, भाजपा जिल्हा मीडिया सदस्य निलेश पाटील, भाजपा तालुका महिला उपाध्यक्ष संगीता चौधरी, शहराध्यक्ष जयश्री चौधरी, जिल्हा नमो मंचच्या मोहिनी पाटील, यावल वनसंरक्षक प्रादेशिक कॅम्पा राजेंद्र राणी, वन परीरक्षेत्र अधिकारी यावल पूर्व विजय पाटील, फैजपूर वनक्षेत्रपाल प्रकाश पाटील यांची उपस्थिती होती. ठेकेदार संजय वाणी व मनोज अकोले वनरक्षक डी.डी.जाधव, जी.बी.डोंगरे, अश्विनी धात्रक, अंजली राठोड, आर.सी.सोनवणे, जी.बी.नागरगोजे, आर.एस.काटे, जितेंद्र सपकाळे आदी उपस्थित होते.