फैजपूरात संचारबंदीत अवैधरीत्या चढ्या भावाने दारू विक्री
फैजपूर : शहरात कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू असल्याने शहरात गेल्या काही दिवसापासून देशी-विदेशी व गुटखाविक्री करणार्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. तीन ते चार पट किमतीने त्याची विक्री होत आहे. शनिवारी पोलिसांनी बाहेर पेठ भागात अवैध देशी दारू विकणार्या एकाला अटक करून त्यांच्याकडून 200 देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. खेमचंद किसन भोई असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.,
बाहेरपेठ भागातून एकाला अटक
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहे मात्र या आदेशाचे उल्लंघन करत शनिवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास बाहेर पेठ भागातील खेमचंद किसन भोई हा त्याच्या घराच्या आडोशाला देशी दारू विकत असल्याची माहिती सहा.निरीक्षक प्रकाश वानखडे यांना मिळाल्यावरून त्यांनी सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, विजय पाचपोळ, इक्बाल सय्यद, उमेश चौधरी यांना या माहितीबद्दल कळविल्या वरून त्यांनी बाहेर पेठ भागात छापा टाकून आरोपी खेमचंद किसन भोई यास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून पाच हजार 200 रुपये किंमतीच्या 200 देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. अमजद खान पठाण यांनी तक्रार दिल्यावरून खेमचंद भोई याच्याविरुद्ध जमावबंदीचे आदेश तोडून अवैद्य दारूची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
देशी दारूचा माल येतो कुठून ?
सध्या फैजपुरात देशी होलसेलर यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. किरकोळ विक्रेते हे होलसेलरकडून देशी खोके विकत घेत असल्याची चर्चा आहे तर पोलिस प्रशासन या मोठ्या झालेल्या माशांना जाळे टाकून का पडकड नाही? याचीही चौकशी पोलिसांनी करायला हवी नेमकी देशी दारूचा माल येतो कुठून ? हा देखील प्रश्न आहे.