पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर लागल्या बँकांबाहेर रांगा
फैजपूर : जून्या काळातील एक म्हण आहे ‘तुम बको हमको इतबार है’ अर्थात तुम्ही कितीही ओरडा, आम्हाला फरक पडणार नाही कारण देशात, राज्यात तर आता गाव पातळीवर कोरोना या संसर्गजन्य आजाराने आपले पाय पसरायला सुरुवात केली असलीतरी नागरीक काही ऐकायला तयार नाही. सोशल डिस्टन्ससिंगची ऐसी की तैसी करण्यात आली आहे. बँकांसमोर तर ग्राहकांनी कहरच केला आहे शेवटी पोलिसांना येऊन ग्राहकांना लाईनीत व सुरळीत अंतर ठेवण्याच्या सूचना द्याव्या लागत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून बँक बंद असल्याने शुक्रवारी बँक उघडताच ग्राहकांनी व्यवहार करण्यासाठी एकच गर्दी केली. शहरातील सुभाष चौकात असलेल्या युनियन बँकेसमोर ग्राहकांची मोठी गर्दी जमली होती. बँकेत केवळ चारच ग्राहकांना सोडण्यात येत होते. मात्र बँक बाहेर ग्राहक एकमेकांना खेटून उभे होते त्यांना ना कोरोनाची भीती ना कुणीतरी आपल्यासाठी ओरडून ओरडून सांगत आहे याची चिंता नव्हती. त्यातच जनधन खात्यामध्ये आलेली रक्कम करणार्यांच त्यात भर पडली होती. या सर्वांना सोशल डिस्टन्सीची ऐसी की तैशी केली होती. शेवटी पोलिसांनी ग्राहकांची गर्दी पांगवली व सर्वांना एका लाईनीत सुरळीत व सुरक्षित अंतरावर उभे करून व्यवहार करण्याच्या सूचना केल्या.