फैजपूरात स्वच्छता रॅलीने वेधले

0

ओला व सुका कचरा घंटागाडीत टाकावा -मुख्याधिकारी किशोर चव्हाण

फैजपूर- विद्यार्थ्यांनी घर व परीसरातील नागरिकांना घनकचरा ओला व सुका कचरा वेगळा करून पालिकेच्या घंटा गाडीमध्ये टाकण्याची जनजागृती करावी, असे आवाहन मुख्याधिकारी किशोर चव्हाण स्वछता रॅलीच्या शुभारंभप्रसंगी केले. म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहातून शनिवारी स्वच्छता रॅली काढण्यात आली. तत्पूर्वी म्युनिसीपल हायस्कूलमध्ये कृतीसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी कृतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याची तसेच 1936 च्या काँग्रेसच्या ग्रामीण अधिवेशनाच्या इतिहासाचे महत्व विषद करून घनकचरा वर्गीकरणाचे महत्व स्पष्ट केले.

यांची होती उपस्थिती
नगराध्यक्षा महानंदा होले, उपनगराध्यक्ष कलीम खां मन्यार, नगरसेवक हेमराज चौधरी, आरोग्य समिती सभापती अमोल निंबाळे, शिक्षण समिती सभापती वत्सला कुंभार, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, रवींद्र होले, शेख इरफान, विक्की बागुल, मुख्याध्यापक आर.एल.आगळे, पर्यवेक्षक एस.ओ.सराफ, एन.सी.सी.चे एस.एम.राजपूत, बी.डी.महाले, वाय.एस.महाजन यांच्यासह शिक्षक-शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वच्छता रॅलीने शहरवासीयांचा वाढवला उत्साह
म्युनीसीपल हायस्कूलपासून विद्यार्थ्यांच्या स्वच्छता रॅलीला सुरुवात झाली. ही रॅली सुभाष चौकमार्गे खुशाल भाऊ रोड, रथगल्ली, होलवाडा, लक्कडपेठ, कासारगल्लीमार्गे सुभाष चौक व परत म्युनीसीपल हायस्कूलजवळ रॅलीचा समारोप झाला. ‘आपले शहर स्वच्छ व सुंदर’ ठेवण्यासाठी घोषणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. शिक्षक एस.एम.राजपूत यांनी ‘चला चला गांव स्वच्छ व सुंदर करू’ या गीतासह विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला हे गीत रॅलीचे विशेष आकर्षण ठरले. रॅली यशस्वीते मुख्याध्यापक आर.एल.आगळे व पर्यवेक्षक एस.ओ.सराफ यांच्या मार्गदर्शनाखालीसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन बी.डी.महाले यांनी तर आभार वाय.एस.महाजन यांनी मानले.