फैजपूर- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत चित्रीकरण करून हिंदू धर्माच्या भावना तसेच हिंदू धर्मा बद्दल अपशब्द बोलून दोन समाजात तेड निर्माण करण्याचे काम केल्याप्रकरणी शहरातील संशयीत आरोपी शेख आरीफ शेख करीम विरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील सर्व व्हॉट्सअप गृपवर याबाबतचा व्हिडिओदेखील टाकण्यात आल्याने भाजप तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे (बामणोद) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास एपीआय दत्तात्रय निकम करीत आहे.