भुसावळ : फैजपूर येथील तापी परीसर विद्या मंडळाच्या धनाजी नाना महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागातर्फे 21 व 22 डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय परीषद होत आहे.
संस्थाध्यक्ष व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रेरणा, प्राचार्य डॉ प्रमोद चौधरी यांचे सूक्ष्म नियोजन, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख आयोजक प्रा.विलास बोरोले तसेच परीषदेचे संयोजक चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील प्राणीशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ.पी.एस. लोहार यांच्या संयुक्त प्रयत्नातून परीषद होत आहे.