फैजपूरात 23 दुचाकींवर प्रांताधिकार्‍यांनी केली कारवाई

0

चार हजार 600 रुपयांचा दंड केला वसुल

फैजपूर : शहरासह राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश असताना काही नागरी विनाकारण दुचाकीवर बाहेर फिरत असल्याने अशा नागरीकांवर सोमवारी संध्याकाळी सुभाष चौकात प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व एपीआय प्रकाश वानखडे यांनी दंडात्मक कारवाई करीत 23 दुचाकीस्वारांकडून चार हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला.

दररोज होणार कारवाई
कोरोना या गंभीर आजाराला नागरीक जुमानत नाही. संचारबंदी असून सुद्धा कायद्याला न जुमानता बिनधास्तपणे नागरीक गावात फिरत असल्याने व कोरोना आपल्याला होणार नाही व कायद्याला आपण घाबरत नाही, अशा भ्रमात राहून नागरीक विनाकारण बाहेर पडत आहे. अशा वाहनांवर संध्याकाळी 5 ते 8 वाजे पर्यंत सुभाष चौकात 23 दुचाकींवर कारवाई करून चार हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या झालेल्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आता जे विनाकारण नागरिक घराबाहेर पडतील आशा नागरीकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
यावेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, एपीआय प्रकाश वानखडे, बाळू भाई, अमजत पठाण, गुलबक्ष तडवी ,मोहन लोखंडे, विजय पाचपोळ, शेख इकबाल, प्रांत कार्यालयातील उमेश तळेकर व योगेश केदारे उपस्थित होते.