फैजपूरात 42 अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा

0

छत्री चौकातील 12 व्यावसायीकांसह धाडी नदीपात्रातील 30 जणांचा समावेश

फैजपूर- पालिकेकडून छत्री चौकात 70 लाख रुपये खर्चून ऐतिहासिक 1936 च्या ग्रामीण काँग्रेस अधिवेशनाचे संकल्प चित्र उभारण्यात आले आहे, पण या संकल्प चित्रासमोरच मोठ्या प्रमाणावर व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने हे अतिक्रमण रहदारीलासुद्धा अडसर ठरत आहे. त्यामुळे हा रस्ता मोकळा करावा याबाबत 12 व्यावसायिकांंना पालिकेने नोटिसा बजावत सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याची तंबी दिली आहे शिवाय धाडी नदीपात्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून अनेक जण वास्तव्य करीत 30 जणांना नोटीस बजावण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

पालिकेच्या नोटीसांमुळे खळबळ
पालिकेने श्रीराम टॉकीज ते लक्कड पेठपर्यंत रस्त्याचे काम सुरू केले आहे. या अतिक्रमणामुळे रस्त्याच्या कामाला अडचणी येत आहेत. हा रस्ता झाल्यास शहरातील रहदारीचा ताण कमी होऊन भेट खिरोदा रस्त्यापर्यंत अथवा लक्कड पेठमध्ये जाणाजया नागरीकांसाठी सोयीचे होणार आहे. त्यामुळे नदीपात्रात वास्तव्य करणाजया अशा 30 रहिवाशांनासुद्धा पालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहे. त्यांना 15 दिवसांच्या आत अतिक्रमण काढण्याचे नोटिशीत नमूद आहे.दरम्यान, व्यावसायिक व अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे अन्यथा पालिकेकडून अतिक्रमण काढून संबंधितांवर ती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी तंबी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी नोटीसीद्वारे दिली आहे.