फैजपूरात 60 किलो गोमांस जप्त : तिघे संशयीत ताब्यात

फैजपूर : रीक्षातून बेकायदेशीररीत्या गोमांसाची वाहतूक करणार्‍या तिघांना फैजपूर पोलिसांनी कारवाई करीत ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. फैजपूर पोलिस ठाण्याचे पोलीस कर्मचारी मंगळवार, 7 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना साखर कारखान्याजवळ रीक्षा (क्रमांक एम.एच.19 एस.8103) मध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर रीक्षा अडवून तिची तपासणी केली असता त्यात 60 किलो गोमांस आढळले. या प्रकरणी शेख काफिल शेख गंभीर (हजीरा मोहल्ला, फैजपूर), अनिस खान अजीज खान (फैजपूर) व रईस (पूर्ण नाव माहित नाही) यांना ताब्यात घेण्यात आले तसेच रीक्षा जप्त करण्यात आली. पोलिस नाईक महेंद्र महाजन यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक सिद्धेश आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली देविदास सुरदास करीत आहे.