फैजपूर । येथील उर्दू कन्या शाळेत शैक्षणिक धोरणानुसार मुलींचे शैण्णिक व सर्वांगिण विकासासाठी शाळा स्तरावर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रफिक अहमद यांच्या हस्ते क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून शेख रईसोद्दीन, इस्माईल खॉ तडवी, पत्रकार राजू तडवी, कामील शेख, सलीम पिंजारी उपस्थित होते. मुख्याध्यापक अ. रशिद जनाब यांनी सत्कार केला.
मान्यवरांनी केले मार्गदर्शन
शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांचे सुप्त गुणांना वाव मिळावा व त्यांचा बौध्दीक व शारिरीक विकास व्हावा या हेतून कार्यक्रमाची रुपरेषा सर्वांसमोर सादीक यांनी मांडली. क्रिडा स्पर्धा व त्याचे महत्व, नियोजन, मार्गदर्शन शेख कमाल यांनी पटवून दिले. यशस्वीतेसाठी हारुण जनाब, अशफाक जनाब, जावेद तडवी, आसीफ, सादीक, ताबीश आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन कमाल यांनी केले.