फैजपूर नगरपरीषदेतर्फे 11 बचत गटांना 10 हजारांचा फिरता निधी

0

नगराध्यक्ष महानंदा होले यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण

फैजपूर- फैजपूर नगरपरीषद दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानतर्फे शहर समृद्धी पंधरवाडांतर्गत गावातील 11 बचत गटांना 10 हजार प्रमाणे फिरता निधी धनादेशाद्वारे वाटप करण्यात आला. मंगळवारी दुपारी 12 वाजता पालिका सभागृहामध्ये गावातील सर्व बचत गटांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष महानंदा टेकाम होले होत्या.

सहा बचत गटांना 12 लाख कर्ज मंजूर
सहा महिला बचट गटांना युनियन बँक व भारतीय स्टेट बँक यांच्याकडून दोन लाख रुपये प्रमाणे 12 लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले तसेच दोन वैयक्तिक लाभार्थींना 50 हजारांप्रमाणे एक लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले.  नगराध्यक्ष महानंदा होले म्हणाल्या की, महिलांनी गृहिणी सोबत उद्योगी महिला होणे गरजेचे आहे. महिलांनी या उद्योगात पुरुषांच्या पुढे जाऊन महिलांचा सन्मान वाढविला पाहिजे तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी अनेक योजना आणल्या असून त्या योजनेचा फायदा आपण घेतला पाहिजे.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास जिल्हा समन्वयक युवराज पाटील, नगरपालिका प्रशासकीय अधिकारी सुभाष ठाणगे, करनिरीक्षक सुधाकर नवले, पाणीपुरवठा अभियंता विपुल साळुंखे, बांधकाम अभियंता कृष्णसागर डांगे, दीपक तायडे यासह बचत गटातील महिलांची उपस्थिती मोठी होती. कार्यक्रमाचे नियोजन प्रवीण सपकाळे, विद्या सरोदे व अश्विन सरोदे यांनी केले. दरम्यान, रमाई आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, दशमाता, विठ्ठल माउली, एकलव्य, बुद्धप्रणाली, दिप, साईबाबा, क्रांती, प्रभात व राधाकृष्ण बचत गट यांना 10 हजारांप्रमाणे फिरता निधी देण्यात आला तर राधाराणी, साईनाथ, श्री सिद्धिविनायक, सातपुडा, श्री समर्थ व सप्तशृंगी या बचत गटांना दोन लाख प्रमाणे युनियन बँक व भारतीय स्टेट बँकेने कर्ज मंजुरीचे अधिकृत पत्र दिले.