फैजपूर । रावेर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिभाऊ जावळे यांच्या जिल्हा नियोजन समिती निधीतून हिंगोणा ते बोरखेडा रस्ता डांबरीकरण करणे व जळगावचे आमदार सुरेश भोळे यांच्या जिल्हा नियोजन समिती निधीतून हिंगोणा ते मोरधरण रस्ता डांबरीकरण करणे 20 लक्ष रुपये व हिंगोणा ते हंबर्डी रस्ता खडीकरण करणे 5 लक्ष रुपये आदी विकासकामांचे उद्घाटन आमदार हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.
वाहनधारकांचा त्रास होणार कमी
यावेळी जिल्हा पषिद सदस्या सविता भालेराव, तालुकाध्यक्ष डॉ. नरेंद्र कोल्हे, जिल्हा उपाध्यक्ष हिराभाऊ चौधरी, रावेर पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, पंचायत समिती सदस्य योगेश भंगाळे, हिंगोणा सरपंच नवलसिंग लोंढे, श्याम महाजन, शशिकांत चौधरी, राजेंद्र महाजन, बबलू भालेराव, घनश्याम गाजरे, अरमान तडवी, शिवसेना माजी तालुकाप्रमुख विजयसिंह राजपूत, संतोष सावळे, मुरलीधर इंगळे, पप्पू चौधरी आदी उपस्थित होते. वरील तिनही रस्ते गावांतर्गत जात असल्यामुळे वाहतुकीसाठी होणारा त्रास यातून कमी होणार आहे. तसेच शेतरस्ते सुध्दा होणार असल्यामुळे शेतकरीवर्ग व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.