प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
फैजपूर– दरवर्षी भांडवली आकारणीवर नागरीकांचे तक्रार अर्ज प्राप्त झाले असता या वर्षी 65 नागरिकांनी पालिकेत भांडवली आकारणी संदर्भात तक्रार अर्ज आले होते. या अर्जावर बुधवारी सुनावणी करण्यात आली असून योग्य निर्णय समितीने दिला आहे. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात सकाळी 11 वाजता बैठक झाली. या समितीमध्ये नगररचना विभागाचे अधिकारी धुळे मिलिंद अहिरे, नगराध्यक्ष महानंदा टेकाम होले, विरोधी पक्ष नेते शे. कुर्बान व महिला बालकल्याण सभापती शकुंतला भारंबे या पाच जणांची समिती गठीत करण्यात आली होती. शासकीय अधिकारी सुवर्णा ओगले शिंदे व कर निरीक्षक विशाल काळे उपस्थित होते. या बैठकीत भांडवली आकारणी घरपट्टी संदर्भात अर्ज प्राप्त झाले होते. समितीने सर्व अर्जदारांचे म्हणणे एकूण घेतले. वसुली चांगली व्हावी, नागरीकांवर अन्याय होणार नाही आणि नियमांच्या अधीन राहून योग्य निर्णय समितीने घेतला असून नियमानुसार भांडवल आकारणी कमी करण्यात आले आहे. या समितीच्या निर्णयाने नागरीरकांनामध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.