फैजपूर पालिकेची आरक्षण सोडत जाहीर : प्रत्येक वॉर्डात महिलांना संधी

फैजपूर : फैजपूर नगरपरीषदेच्या 10 प्रभागातून एकूण 21 नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. फैजपूर नगरपालिकेने ओबीसी जागेचे आरक्षण वगळता इतर आरक्षण जाहीर केले आहे. प्रभाग क्रमांक दोन, प्रभाग आठ व प्रभाग क्रमांक 10 हे प्रभाग वगळता सर्वच प्रभागांमध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण धोरणानुसार प्रत्येक प्रभागात एक महिला राखीव ठेवण्यात आली आहे आणि प्रत्येक वॉर्डातील एक जागा सर्वसाधारण ठेवण्यात आली आहे.

यांची आरक्षण सोडतप्रसंगी उपस्थिती
प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य अधिकारी वैभव लोंढे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी शहरातील आजी-माजी नगरसेवकांसह बहुसंख्य नागरीक उपस्थित होते. देवेश्री विनोद बोरोले या बालिकेच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली.

असे आहे पालिकेचे प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग क्रमांक एक अ व ब- सर्वसाधारण महिला राखीव, क- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक दोन अ- अनुसचित जमाती, ब- सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक तीन अ- सर्वसाधारण महिला राखीव, ब- सर्वसाधारण, प्रभाग चार अ- सर्वसाधारण महिला राखीव, ब- सर्वसाधारण, प्रभाग पाच अ- सर्वसाधारण महिला राखीव, ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सहा अ- सर्वसाधारण महिला राखीव, ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सात अ- सर्वसाधारण महिला राखीव, ब- सर्वसाधारण, प्रभाग आठ अ- अनुसूचित जाती महिला राखीव, ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक नऊ अ- सर्वसाधारण महिला राखीव, ब- सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 अ- अनुसूचित जमाती महिला, ब- सर्वसाधारण