फैजपूर– नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी पालिकेच्या सभागृहात खेळीमेळीच्या वातावरणात होवून शहर विकासाच्या 56 विषयांना मंजुरी देण्यात आली. शुक्रवारी सकाळी11 वाजता पालिका सभागृताहात नगराध्यक्ष महानंदा टेकाम होले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मुख्याधिकारी सुवर्णा-ओगले शिंदे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
या विकासकामांना मिळाली मंजुरी
सभेत वार्षिक एक ते अठरा निविदांना मंजुरी मिळाली. शहरातील खडीकरण, आठवडे बाजार भाग दोनसाठी रस्ता, पत्री शेड व वटे उभारणी, स्टेट लाईट, सतपंथ मंदिर हॉलजवळ पेव्हर ब्लॉक बसविणे, गटारी, गावातील व नवीन कॉलनीसाठी रस्ता तसेच पालिका कर्मचारी मोतीलाल घावरे यांच्या स्वेच्छा निवृत्ती अर्जाला मंजुरी देण्यात आली. मागील इतिवृत्त सभेचे वाचन सभा लिपिक सुधीर चौधरी यांनी केले. सभेला कनिष्ठ अभियंता एम.आय.शेख, सहाय्यक निरीक्षक विशाल काळे, गटनेते मिलिंद वाघुळदे, कलीम मणियार, शेख कुर्बान, नयना चौधरी व नगरसेवक उपस्थित होते.
कर्मचारी आश्वासीत योजनेस मंजुरी
पालिका सर्वसाधारण सभेत जे कर्मचारी या आश्वासीत योजनेस पात्र असतील त्यांना लागलीच पदोन्नती देण्याचा महत्व पूर्ण विषय आज मंजूर करण्यात आल्याने कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले.