फैजपूरातील भाजपा पदाधिकार्यांचे निवेदन
फैजपूर : यावल-रावेर विभागाचे प्रांताधिकारी अजित थोरबोले यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी फैजपूर भाजपा पदाधिकार्यांनी निवेदनाद्वारे केली असून रावेरातील काही लोकांकडून प्रांताधिकार्यांना वाहनात बसू देण्यास मज्जाव करण्यात आल्याच्या घटनेचाही निषेधही करण्यात आला आहे. कोरोनासारख्या कठीण काळात प्रांताधिकारी हे तालुक्यासाठी इंसीडेंट कमांडर म्हणून कामकाज करत असताना सर्व प्रशासकीय यंत्रणाचे प्रमुख म्हणून कामकाज करत आहे त्यामुळे अप्रिय घटनेमुळे कर्मचारी आणि अधिकारी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनावर भारतीय जनता पार्टी फैजपूर भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, फैजपूर भाजपा शहर सरचिटणीस, संजय सराफ, दीपक होले, पदाधिकारी व कार्यकर्ते आदींच्या स्वाक्षर्या आहेत.