फैजपूर मर्चंट सोसायटीच्या नावे चार कोटी 20 लाख जमवत फसवणूक : पाच जणांविरोधात गुन्हा

Fraud in the name of depositing amount in favor of Faizpur Merchant Society : Crime against five persons फैजपूर : फैजपूर मर्चंट सोसायटीच्या नावे रक्कम जमा करण्याच्या नावाखाली तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून तब्बल चार कोटी 20 लाखांची रक्कम जमा करून ती सोसायटीत जमा न करता अपहार केल्याप्रकरणी यावल न्यायालयाच्या आदेशाने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने फैजपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

असे आहे प्रकरण
तक्रारदार रवींद्र भागवत जावळे (60, फैजपूर) यांनी याबाबत यावल न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, संशयीतांनी फिर्यादीच्या नातेवाईकांकडून फैजपूर मर्चंटच्या नावाने तब्बल चार कोटी 20 लाखांची रक्कम जमा केली मात्र पतसंस्थेत ही रक्कम जमा न करता परस्पर लाटून अपहार करीत फसवणूक केली तसेच बोगस कागदपत्रे बनवण्याचा प्रकारही करीत शासनाची फसवणूक केली. यावल न्यायालयाने या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर फैजपूर पोलिसात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
तक्रारदार रवींद्र भागवत जावळे यांच्या तक्रारीवरून उमेश मुकुंदा वाणी (50, रा.11/1, ढाकेवाडी, जळगाव), अशोक गोपनाथ मंडोरे (60, प्लॉटन 10, श्रद्धा बंगला, गणपती नगर, जळगाव), प्रदीप अरुण वाणाई (40, खान्देश मिल कॉलनी, जळगाव), संजय मोतीराम जैन (45, जळगाव), जी.के.भारंबे (61, रोझोदा ता.यावल) यांच्याविरोधात भादंवि 406, 409, 420, 468, 120 ब, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हवालदार अनिल पाटील करीत आहेत.