फैजपूर येथे एकनाथी भागवत पारायणाचा शुभारंभ

0

फैजपूर : येथील बसस्थानकासमोरील भव्य प्रांगणात एकनाथी भागवत पारायणाचा सोमवार 26 रोजी सकाळी मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, 25 रोजी शहरात भव्य दिंडी काढण्यात आली होती. यामुळे शहरातील वातावरण भक्तिमय व पांडूरंगाच्या जयघोषाने दुमदुमून गेले. आज पारायणाची नियोजित वेळेत सुरुवात झाली. या पारायणाचा लाभ पंचक्रोशीतील शेकडो भक्त घेत असून भक्तिमंडप खचाखच भरलेला आहे.

परिसरात प्रथमच एकनाथी भागवत पारायण होत असल्याने याचा लाभ घेण्यासाठी तरुणांपासून वृध्दांपर्यंत सर्वांनाच आतुरता होती. पारायण वाचनासाठी व्यासपीठावर ख्यातनाम कीर्तनकार हभर कन्हैय्या महाराज, पंढरीनाथ महाराज, श्रीपाद महाराज, बलभीम महाराज, माधव महाराज, भानुदास महाराज, विघ्नेश्‍वर महाराज, तुळशीराम महाराज, वासुदेव महाराज, अरुण महाराज, सचिन महाराज, सहदेव महाराज, शिवशंकर महाराज, मनोज महाराज आदी कीर्तनकार उपस्थित आहे. 26 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत चालणार्‍या या सोहळ्यात दररोज रात्री 8 ते 10 कीर्तन होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन समितीचे पदाधिकारी चोलदास पाटील, नरेंद्र नारखेडे, निलेश राणे, प्रविणदास महाराज, हरिभाऊ इंगळे, चंद्रशेखर चौधरी, सी.के. चौधरी, काशिनाथ वारके, विजय परदेशी, नेहेते यांनी केले आहे.