फैजपूर येथे ऐतिहासिक बारागाड्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी

0

फैजपूर । शहरात सव्वाशे वर्षापासून सालाबाद प्रमाणे श्रावण मासाच्या दुसर्‍या मंगळवारी मरिमातेच्या बारागाड्या ओढण्याचा येथील उक्रमाचा इतिहास असून मंगळवार 1 ऑगस्ट रोजी परंपरेनुसार मरिमातेच्या बारागाडया ओढल्या जाणार आहेत. यानिमित्त दिवसभर यात्रा भरली जाते. श्रावण शु. वैद्य रोजी गेल्या सव्वाशे वर्षापासून शहरात हा उपक्रम परंपरेचा इतिहास आहे.

शहरवासियांच्या सहकार्याने यात्रा
येथील शस्त्रसामुग्री घराण्यातून शहर वासियांच्या सहकार्याने राबविला जात आहे. शस्त्रसामुग्री कै.कालू कोळी यांनी त्यानंतर त्यांचे पुत्र शस्त्रसामुग्री कै.महारु कालु कोळी यांनी अनेक वर्ष बारागाड्या ओढण्याचा उपक्रम राबविला आहे. त्यानंतर त्यांचे पुत्र भगत विठ्ठल महारु कोळी हे बारागाडया ओढत आहे.

शहरात निर्माण झाले उत्सवाचे वातावरण
सालाबादप्रमाणे परंपरागत पद्धतीने मंगळवार 1 ऑगस्ट रोजी मरिमातेच्या बारागाडया ओढण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यानिमित्त मरिमाता मंदिर परिसर, सुभाष चौक ते म्युनिसिपल हायस्कूलपर्यंत दिवसभर यात्रा भरते. बारागाडया बघण्यासाठी शहरासह पंचक्रोशितुन भाविक हजेरी देतात. बारागाडया उत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने मरिमाता मंदिरांची रंगरंगोटीचे व मंदिराला आकर्षक रोषणाईने सजविण्याचे काम पूर्ण झाले असून हा उत्सव साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.

परंपरागत पद्धत
भगत विठ्ठल कोळी यांच्या न्हावी दरवाजा भागातील राहत्या घरून दुपारी 3 वाजता बारागाडया ओढण्याच्या मिरवणुकीला प्रारंभ होतो. भगत विठ्ठल कोळी यांनी मिरवणुकी दरम्यान प्रथम शहरातील नाथवाडा येथील मरिमातेचे, अंबिका देवी, मोठा मारुती मंदिर, व मिरवणुक मार्गावरील देवस्थांनांचे दर्शन घेतल्यानंतर सायंकाळी 6 वाजता म्युनिसिपल हॉयस्कूल ते सुभाष चौक दरम्यान बारागाडया ओढ़तात यानंतर श्रीराम मंदिरात शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचा सन्मान केला जातो व श्रावणच्या तिसर्‍या सोमवारी मरिमातेच्या बारागाड्यांचा प्रसाद म्हणून भंडारा दिला जातो.