फैजपूर येथे बारागाड्या उत्साहात

0

फैजपूर। शहरवासीयांच्या रक्षणार्थ आणि उत्तम आरोग्यासाठी 117 वर्षांपासून अखंडित गावदेवी मरीमाता नवसाच्या बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. मंगळवार 1 रोजी सकाळपासूनच शहरातील आठवडे बाजारातील गावदेवी मरीमाताच्या दर्शनार्थ शहरातील भाविक भक्तांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या.

याप्रसंगी पुरुषोत्तम चौधरी, भागवत झांबरे, सुरेश सोनवणे, भास्कर कपले, राजू मेढे, नरेंद्र वाघुळदे, मुरली गाजरे, राजू कोळी यांची मदत लाभली. बारागाड़ी भाविकांनी भरगच्चं भरली होती. या मार्गावरील रस्ते, इमारती भाविकांच्या गर्दीने व्यापली होती. बारागाडी ओढली नंतर भगत बुव्वाणी या वर्षी चांगल्या पावसा सह खरिपाची फसलं चांगले होण्याचे संकेत दिले.

उत्तम आरोग्याची मनोकामना
हजारो शहरवासीयांनी आपल्या व कुटुंबाच्या रक्षण व उत्तम आरोग्यची मनोकामना करीत देवीला नतमस्तक झाले. दुपारी तीन वाजेपासून भगत विठ्ठल कोळी यांच्या घरापासून त्यांचे सहकार्‍यांच्या उपस्थित नवरथाची वाजत-गाजत मिरवणूक निघाली होती. ती देवी वाडा, नाथवाडा, मोठा हनुमान मंदिर, सुभाष चौक मार्गे निघत म्युनिसिपल हायस्कुल जवळील उभ्या असलेल्या बारागाड्याना प्रदिक्षणा घालून सुभाष चौका पर्यंत भगत विठ्ठल कोळी व त्यांचे सहकारी खुशाल गाजरे, संजय कोल्हे यांनी ओढली.