फैजपूर येथे सुरु असलेल्या बियरबारला कुणाचे वरदहस्त

0

फैजपूर। उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महामार्गालगत 500 मिटर अंतरावरील परमिट रुम बियर बार बंद करण्याचे आदेश असताना देखील शहरातील काही हॉटेल सुरु असून येथे मद्यविक्री होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष पप्पू चौधरी यांनी जिल्हा अधिक्षक (राज्य उत्पादन शुल्क विभाग जळगाव) यांच्याकडे माहिती अधिकारात व लेखी तक्रारी अर्ज देवून हरकत नोंदविली आहे.

चढ्या भावाने होते दारुविक्री
या तक्रारीत म्हटले आहे की, उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये 1 एप्रिल 2017 पासून महामार्गापासून 500 मिटर अंतरामधील सर्व परमिट रुम बियर बार बंद करण्याचे लेखी आदेश असतांना सुध्दा हॉटेल आकाशलक्ष ही ‘कुणाच्या वरदहस्ताने’ सुरु करण्यात आली. रावेर-यावल तालुक्यात फक्त या एकाच हॉटेल मालकाला हॉटेल सुरु करण्याचे आदेश कसे? का संबंधित अधिकार्‍यांनी चिरीमिरी घेवून हॉटेल सुरु करण्यात आली असावी? तसेच महामार्गापासून हॉटेलच्या अंतराची मोजणी करण्यात आली. या मोजणीवर आक्षेप घेत ही मोजणी कुणाच्या समक्ष करण्यात आली. त्याची लेखी माहिती व केलेली मोजणी शिटची नक्कल व केलेला पंचनामा या सर्वांची लेखी माहिती देवून आमच्या समक्ष मोेजणी करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पप्पू चौधरी यांनी केली आहे. त्याचसोबत रात्री 10 वाजेनंतर हॉटेल व परमिट रुम सुरु न ठेवण्याचे आदेश संबंधित विभागाचे असतांना सुध्दा रात्री 12 वाजेपर्यंत हॉटेल सुरु ठेवून चढ्या भावाने दारुविक्री होत असल्यामुळे या विषयाची चौकशी करण्यात यावी. कारण 9 एप्रिल रोजी महावीर जयंती असतांना सुध्दा वरील सर्व प्रकार सुरु होता. हा सर्व प्रकार संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांच्या कामावर फोनवरुन टाकला. तरीसुध्दा कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. शेवटी स्वतः एपीआय सार्थक नेहेते यांनी जावून ही हॉटेल बंद केली. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नसल्यामुळे नक्कीच जणू चिरीमिरीचा विषय असावा असा आरोप सुध्दा
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष पप्पू चौधरी यांनी केला आहे.