फैजपूर : जमाते इस्लामी हिंद शाखेतर्फे ईदमिलाद निमित्त सुभाष चौकात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये शहरातील 105 दात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नगरसेवक मिलींद वाघुळदे यांनी ईश्वरभक्ती, समाजकार्य, हक्क आणि कर्तव्य याबाबत विचार मांडले. तसेच चंद्रशेखर चौधरी यांनीही चांगल्या कामाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अब्दुल रज्जाक यांनी प्रेषित मोहम्मद (स.) च्या पवित्र जीवनाबद्दल माहिती दिली.
उपस्थित मान्यवर
प्रेषित मोहम्मद (स.) सर्व मानवतेचे आहे. आपण त्यांच्या कार्याचे आकलन करुन व्यक्तिगत व समाजात परिवर्तन घडवू शकतो, असेे आवाहन केले. यावेळी शेख इरफान, अब्दुल सत्तार, आरिफ उमर, मलक अख्तर, शेख करीम, मोहसिन शेख, रईस शेख इमरान शेख आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन अकबर यांनी केले.