यावल- फैजपूर उपविभागीय कार्यालयामार्फत विभागातील दहा तलाठ्यांच्या बदल्याचे आदेश फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी काढले. या बदल्यांमध्ये फैजपूर तलाठी एफ.एस.खान यांची खिर्डीत, आडगावचे एम.एच.तडवी यांची थोरगव्हाणला, निमगावचे के.झे.सरदार यांची आडगावला, अट्रावलचे जी.डी.भगत यांची भालोदला, कर्जोदचे दिलीप बाबुराव पवार यांची रावेर-धामोडी, दुसखेड्याचे पी.पी.जावळे यांची फैजपूरला, खिर्डीच्या योगीता न्हाळदे यांची थेरोळ्यात, थोरगव्हाणचे शैलेश अंकुश झोटे यांची केर्हाळ्यात, केर्हाळचे कैलास रघुनाथ पाटील यांची कर्जोदला तर भालोदचे एन.जे.धांडे यांची अट्रावलला बदली करण्यात आली.