बोदवड- नातेवाईक असल्याचे सांगून फैजपूर येथील 20 वर्षीय विवाहितेवर बोदवडमधील तिघा आरोपींनी अत्याचार केल्याची घटना येथे घडली होती. या प्रकरणी तिघाही आरोपींना बोदवड पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला आरोपींना न्यायालयाने 13 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्यानंतर पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने शुक्रवारी आरोपींना जळगाव जिल्हा कारागृहात हलवण्यात आले.
नातेवाईक असल्याचे सांगून केला अत्याचार
फैजपूर येथील 20 वर्षीय पीडीत विवाहितेला संशयीत आरोपी सद्दाम जानमोहमंद कुरेशी (26, कुरेशी मोहल्ला, रा.बोदवड) याने फोन करीत आपण नातलग असल्याचे सांगत बोदवड येथे भेटण्यासाठी बोलावले होते. पीडीता बोदवड येथील बसस्थानकावर आल्यानंतर आरोपीने एका लाल रंगाच्या विना क्रमांकाच्या मालवाहू गाडीतून एका ताटी पत्र्याच्या शेडमध्ये स्वतःसह शेख आबीद शेख बिस्मिल्ला कुरेशी (24, रा.कुरेशी मोहल्ला, बोदवड) तसेच शेख इम्रान ईस्माईल कुरेशी (24, रा.सतरंगी मोहल्ला, बोदवड) या सामूहिक अत्याचार केला होता.
यावेळी पीडीतेने आरोपींसोबत झटापट करीत तेथून पळ काढला होता व आरोपींनी घटनेबाबत कुणाला काही सांगितल्यास सोशल मीडियावर बदनामी करण्याचीही धमकी दिली होती. या प्रकरणी पीडीतेने पोलिसात धाव घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना वरिीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर यांह इतर ठिकाणांहून 10 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अटक करण्यात आली होती. आरोपींची शुक्रवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर बोदवड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती एस.डी.गरड यांनी आरोपींना 27 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.