फैजपूर शहराचे तापमान पोहोचले 42.5 अंशावर

0
फैजपूर:- गेल्या आठ दिवसांपासून शहराच्या तापमानात दिवसागणिक होत असून मंगळवारी शहराचे तापमान तब्बल 42.5 अंशावर पोहोचले. तशी नोंद मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या तापमापीवर नोंदवली गेली. सकाळी वातावरण थंड तर  दुपारी 12 वाजेनंतर उन्हाचा पारा वाढत असल्याने उन्हामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. एप्रिल महिण्याच्या सुरुवातीलाच तापमानाने उद्रेक केला असून अजून पुढे तापमान वाढण्याची चिन्हे आहेत. दुपारनंतर रस्त्यांवर पूर्ण शुकशुकाट दिसत आहे. यामुळे नागरिक दुपारी 12 वाजेपर्यंत आपली कामे आटोपून दुपारी घरातच बसून राहणे पसंत करतात तर सायंकाळी उशिरानंतर नागरीक बाहेर पडत आहेत. मे मध्ये काय होणार? हा प्रश्‍न सतावत आहे.