फैजपूर शहरात दुकानदाराला धमकावून 15 किलो तांदूळ केला हस्तगत

0

एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्याचा महाप्रताप : गुन्हा दाखल करण्याची मागणी

फैजपूर : गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये हातावर पोट भरणार्‍यांची उपासमार होऊ नये म्हणून अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. यात शहरात दोन दिवस आधी एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रेशनिंग दुकानदाराला धमकावून त्यांच्याकडून पंधरा किलो तांदूळ घेऊन तो गरीब लोकांना वाटण्याचा प्रताप उघड झाला असून याबातची माहिती महसूलमधील एका शासकीय कर्मचार्‍याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.

‘चमको’ सामाजिक कार्यकर्ते प्रशासनाच्या रडारवर
दोन दिवसांपूर्वीच वाघोदा येथील एका रेशनिंग दुकानदाराचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्र व्हायरल झाला. या दुकानदारावर कमी धान्य दिल्याने व जादा भावाने धान्य विक्री केल्याने गुन्हा दाखल करून परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. एकीकडे शासन रेशनिंग दुकानदारांवर कारवाई करीत आहे तर दुसरीकडे असे ‘चमको’ सामाजिक कार्यकर्ते रेशनिंग दुकानदारांकडून दमदाटी करून 15 किलो तांदूळ पैसे न देता घेत आहे. या महाशयाने गरीबांच्याच तोंडाचा घास हिसकावून गरीबांना धान्य वाटप करून मी खूप मोठेपणा केला, असे दर्शवण्याचा प्रयत्न झाला आहे. एखाद्या वेळेस या रेशनिंग दुकानदारांची धान्य साठ्याची चौकशी झाली? आणि त्यात धान्य कमी झाले तर या रेशनिंग दुकानदारांवर कारवाई होऊ शकते म्हणून प्रशासनाने या रेशनिंग दुकानदारांची चौकशी करून त्या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्या महाप्रतापावर गुन्हा दाखल करण्यात यावा , अशी मागणी नागरिक करीत आहे. या सामाजिक संस्थेच्या ‘महाप्रतापा’ची शहरभर सुरू आहे.