फैजपूर:- भावाच्या निधनाची चुकीची बातमी का टाकली याचा राग आल्याने फैजपूर शहरातील पत्रकार उमाकांत पाटील यांना मयताचा भाऊ लखन किरंगे याने सुभाष चौकात मारहाण केली होती. या घटनेचा निषेध शहरातील पत्रकारांनी करीत प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना निवेदन सादर करीत दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दारूच्या नशेत पत्रकाराला मारहाण
भावाबाबत दैनिकात आलेली निधन वार्ता चुकीची असल्याचे लखन किरंगे याचे म्हणणे होते. त्या बातमीचा राग मनात असल्याने लखन किरंगे याने सोमवार, 2 रोजी रात्री नऊ वाजता सुभाष चौकातील एका दुकानावर येवून दारूच्या नशेत उमाकांत पाटील यांना अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवंत ठेवणार नाही, अशी धमकीदेखील दिली. पत्रकारांवर अनेक हल्ले होत असून या घटना थांबण्यासह दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फैजपूर शहरातील सर्व पत्रकारांनी प्रांतधिकार्यांकडे निवेदनाद्वार केली आहे. निवेदनावर वासुदेव सरोदे, अरुण होले, शेख फारूक, उमाकांत पाटील, योगेश सोनवणे, समीर तडवी, सलीम पिंजारी, निलेश पाटील, मयूर मेढे, संजय सराफ, आप्पा चौधरी, शेख कामिल, राजू तडवी, शाकीर मलिक शेख मुदत यांच्या स्वाक्षर्या आहेत.