फॉर्म 16 मध्ये बदल; नोकरदारांवर परिणाम !

0

नवी दिल्लीः आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै करण्यात आली आहे. यात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण प्रत्यक्ष कर निर्धारण बोर्ड (सीबीडीटी)ने फॉर्म 16 जारी करण्याची मुदत वाढवली आहे. तसेच वित्त वर्ष 2018-19मध्ये फॉर्म 24Q भरण्याची शेवटची तारीखही वाढवण्यात आली आहे. फॉर्म 16मध्येही बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार कर्मचाऱ्यांसंदर्भात अधिक माहिती द्यावी लागणार आहे. प्राप्तिकर विभागाने 2018-19मध्ये फॉर्म 16 जारी करण्याची मुदत कंपन्यांना वाढवून दिली आहे. त्यात 25 दिवसांची वाढ करून ती मुदत 10 जुलै करण्यात आली आहे. त्यामुळे आता 10 जुलैपर्यंत कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना फॉर्म 16 जारी करता येणार आहे.