फोटोग्राफी दिनानिमित्त युवा विकास फाऊंडेशनतर्फे कॅमेरापूजन

0

जळगाव । युवा विकास फाऊंडेशन, सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशिय संस्था, लेवा विकास महासंघ यांच्या विद्यमाने जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त कॅमेरापूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी महापौर विष्णू भंगाळे, वाल्मिक पाटील, डॉ.स्नेहल फेगडे, ललित चौधरी, पांडुरंग महाले, चंद्रशेखर नेवे, हेमंत पाटील, शब्बीर सय्यद, संजय जुमनाके, निलेश पाटील यांच्याहस्ते सरस्वतीपूजन करून कॅमेरापूजन करण्यात आले. यावेळी छायाचित्रकार अतुल वडनेरे, सुरेश सानप, जयंत पाटील, शैलेश पाटील, सुमित देशमुख, सचिन पाटील, आबा मकासरे, शैलेश सोनवणे, प्रेम लिंगायत, नितीन सोनवणे, भूषण हंसकर, जुगल पाटील, पंकज ठाकूर यांचा शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ललित महाजन, प्रा.सुरेश अत्तरदे, प्रा.योगेश महाजन, महेंद्र पाटील, राजेश वारके, प्रा.डॉ.निलेश पाटील, ललित खडके, अमोल कोल्हे, नरेंद्र बोरसे, प्रफुल्ल सरोदे, सचिन महाजन, दीपक भारंबे, निखील नेहेते, विजय नारखेडे, विक्की भंगाळे, सुकलाल भोजने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.अतुल इंगळे यांनी केले.