फोटोग्राफी स्पर्धेत उमवि संघ अव्वल

0

जळगाव । रासेरोची राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक सांस्कृतिक स्पर्धा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे झाली. या स्पर्धेत उमविच्या रासेयो संघाने उत्कृष्ट कामगिरी करत तीन बक्षिसे मिळविली यात फोटोग्राफी स्पर्धेत उमवि राज्यात अव्वल ठरले. या यशाबद्दल कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील, प्र.कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव बी.बी.पाटील व प्रा. एस.टी. इंगळे,दिलीप पाटील व दिपक पाटील यांनी अभिनंदन केले.

यांचा होता संघात सहभाग
शुभम तायडे (जे.डी.एम.व्ही.पी.एस.चे महाविद्यालय यावल), यास फोटोग्राफी स्पर्धेत प्रथम तर भित्तीपत्रिक स्पर्धेत प्रज्ञा दुग्गल (मु.जे.महाविद्यालय), हिस द्वितीय क्रमांकाचे बक्षिस मिळाले. भैया फकीर (प्रताप महाविद्यालय, अमळनेर), राहुल निकुंभ व विशाल धनगर (महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोपडा), शुभम तायडे (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल), गणेश पाटील (डॉ. पी.आर घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे), धनराज पाटील (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोनगिर) प्रविण धनगर(एस.पी.डी.एम.महाविद्यालय, शिरपूर), लिलाधर माळी (जी.टी.पी. महाविद्यालय, नंदुरबार), राहुल पाटील(पी.एस.जी.व्ही.पी.एस.चे महाविद्यालय, शहादा), स्नेहा बारेला व कांचन चव्हाण (सामाजिकशास्त्र प्रशाळा, उमवि), कोमल बोरनारे (पी.के.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ), प्रज्ञा दुग्गल (मु.जे. महाविद्यालय), अस्मिता पगारे (मोराणे), दामिनी शर्मा (एम.डी. पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे), धनश्री पाटील(एस.एस.व्ही.पी.एस.चे कला व वाणिज्य महाविद्यालय, धुळे), रिया रोकडे(एस.टी.कॉप.चे महाविद्यालय, शहादा), दामिनी फडे (पी.एस.जी.व्ही.पी.एस.चे महाविद्यालय, शहादा) या विद्यार्थ्यांचा समावेश होता.