कामापूर्वीच श्रेयवादाची ठिणगी ; समजुतीनंतर वादावर पडदा
भुसावळ :- केंद्र शासनाच्या महत्त्वांकाक्षी योजना असलेल्या अमृत योजनेच्या कामासाठी शहरात पाईप लाईन अंथरण्यात येणार असून त्या कामासाठी वापरण्यात येणारे पाईप सोमवारी सकाळी शहरातील पाणीपुरवठा विभागात दाखल झाले. सत्ताधार्यांचे फोटो सेशन सुरू असताना पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर यांना टाळण्यात आल्याने वा त्यांचे फोटोसेशन होत असल्याने त्यांनी आगपाखड उपस्थित सत्ताधार्यांवरच आगपाखड केली तर छायाचित्र काढले न गेल्याने छायाचित्रकारांवर तोंडसुख घेतल्याने शहरातील जनतेतून सत्ताधार्यांवर टिकची झोड उठली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ‘दैनिक जनशक्ती’ने वार्तापत्रातून सडेतोड लिखाण करीत सत्ताधार्यांचे लक्ष वेधल्यानंतर सोमवारी योजनेच्या कामासाठी पाईप दाखल झाले हेदेखील तितकेच विशेष ! दरम्यान, अमृत योजनेच्या कामाला अद्याप सुरवातही झाली नसतानाच सत्ताधार्यांमध्येच श्रेयवादाची ठिणगी पडली असल्याचे भविष्यात हा वाद कुठल्या वळणावर जातो? हे पाहणेदेखील औत्सुक्याचे ठरणार आहे.
पाणीपुरवठा सभापतींचा तोल ढासळला
शहरातील महत्वाकांक्षी अमृत योजनेचे काम भूमिपूजन होवूनही रखडले आहे. याबाबत शहरातून ओरड वाढली असतानाच सोमवारी या कामासाठी कंत्राटदाराकडून पाईपांचा पुरवठा करण्यात आला. पाईप उपलब्ध झाल्यानंतर पाहणी करण्यासाठी सत्ताधारी गटातील सर्व नगरसेवकांना पाणीपुरवठा केंद्रात बोलविण्यात आले होते. नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक हजर झाल्याने फोटोसेशन सुरू झाले मात्र याच दरम्यान पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर यांनी एंन्ट्री करुन सत्ताधार्यांवर आगपाखड सुरू केली. मी पाणीपुरवठा सभापती असतानादेखील माझ्या अनुपस्थितीत हा पाहणी कार्यक्रम कसा होत आहे? फोटोसेशनसाठी माझी वाट का बघितली गेली नाही, असे सांगून त्यांनी कमरेखालील भाषेत संताप व्यक्त केला. याच दरम्यान नगराध्यक्ष भोळे, माजी प्रभारी नगराध्यक्ष लोणारी व अन्य नगरसेवकांनी त्यांची समजूत घालून वाढणार्या वादाला आळा घातला. या प्रकाराची चर्चा शहरात वार्यासारखी पसरली. अमृतच्या कामाला सुरूवात होत नाही, तोच सत्ताधार्यांमध्येच श्रेयवादाची ठिणगी पडल्याचे या प्रकारावरुन निदर्शनास आले.
छायाचित्रकारांवर तोंडसुख
पाणीपुरवठा सभापती राजेंद्र नाटकर यांनी सत्ताधार्यांसोबतच फोटोसेशनसाठी आलेल्या प्रेस फोटोग्राफरांवरही तोंडसुख घेतले. या प्रकारामुळे फोटोग्राफर बांधवांनीही नाराजी व्यक्त केली. मात्र सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी संतापलेले नाटकर आणि फोटोग्राफरांची मनधरणी करून हा वाद मिटवला.