फोटो पडल्याने कार्यालयात दंगडो

0

जळगाव । येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील भूमी अभिलेख कार्यालयात आज दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास महापुरूषाचा फोटो जमिनीवर पडून फुटल्याने दांगडो झाला. भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात लावलला एका महापुरूषाचा फोटो फुटल्याने काही वेळ लोकांनी गोंधळ घातला.

उपअधीक्षकांच्या टेबलावर पडल्याने फोटो फुटल्याची माहिती मिळताच राजा सोनवणे , यशवंत बर्‍हाटे, प्रतिभा शिरसाट ,पराग कोचुरे, अमजद पठाण, जमिल शेख, प्रविण सपकाळे यांनी कार्यालय गाठत उपअधीक्षक चांगदेव मोहळकर यांना माहिती दिली.मात्र ते जवळपास दीड उशिरा आल्याने कार्यकर्ते चिडले. या प्रकाराबद्दल मोहळकर यांनी माफी मागत फोटो दुरूस्त करून आणण्याचे मान्य केले. त्यावरही हा वाद थांबत नसल्याने पोलिसांनी मध्यस्थी केल्यावर त्याच कार्यालयातील दुसर्‍या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला.