नांदेड । नांदेड महानगरपालिकेची लवकरच निवडणूक लागणार आहे. यामुळे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यामधील नगरसेवकांची व नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. याचाच प्रत्यय नुकताच दिसालयला लागला आहे. राज्यात भाजपाचा वाढता जोर पाहता अनेक नेत्यांनी भाजपाची वाट धरली आहे. जिल्ह्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक नगरसेवकांनी आपल्या पक्षाला रामराम करून भाजपा पक्षाची वाट धरली आहे. यात भर म्हणून नांदेड जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुखांसह युवासेना जिल्हाध्यक्षांनीही आपला राजीनामा ‘मातोश्री’वर धाडला आहे. यामुळे शिवसेना मोठा धक्का बसला आहे. निवडणूकीला अवकाश असतांना ही यामुळे नांदेडमध्ये राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.काँग्रेसच्या पाच नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत, तर राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. तर तिकडे शिवसेनेच्या चार नगरसेवकांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे इतर पक्षांना उमेदवार शोधावे लागण्याची चिन्हे दिसत आहे.
सेनेचे नगरसेवक भाजपात!
नांदेड महापालिकेचे राजकारण खुप तापणार आहे.हे तेथे सुरू असलेल्या राजकीय घोडामोडीवरून दिसून येत आहे. ज्या सेनेच्या नगरसेवकांनी राजीनामे दिले आहे.ते शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचे समर्थक आहे. विशेष म्हणजे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्याही आधी घरी जाऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सदिच्छा भेट घेतली होती. या सर्वच पार्श्वभूमीवर आज त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी राजीनामे देऊन, भाजपप्रवेश करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे एकंदरीतच चर्चांना उधाण आले आहे.
जिल्हाप्रमुख, युवासेना जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
निवणूकीपुर्वीच शिवसेनेला दोन मोठे हादरे बसले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख यांनी मिलिंद देशमुख यांनी राजीनामा दिला असून, त्यांनी ‘मातोश्री’वर राजीनामा पाठवला आहे. हा पक्षाला सर्वात मोठा हादरा बसला आहे. तर याच पाठोपाठ युवा सेनेच्या जिल्हाध्यक्षांनाही जिल्हाध्यक्षांच्या पावलावर पाऊल ठेवत नांदेडचे युवासेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांनीही पदाचा राजीनामा दिला आहे. सोबत युवासेनेच्या अनेक पदाधिकार्यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे निवडणूकीच्या तोंडावर जिल्हाप्रमुख शोधण्याची वेळ सेनेवर आली आहे.
कुठल्या पक्षातील किती नगरसेवकांचा भाजपप्रवेश?
शिवसेना – विनय गुर्रम, दीपक रावत, ज्योती खेडकर,वैशाली देशमुख, राष्ट्रवादी -संदीप चिखलिकर, श्रद्धा चव्हाण, काँग्रेस -नवल पोकर्णा, स्नेहा पांढरे, दजितसिंग गिल, सौ. ठाकूर, किशोर यादव, दरम्यान, नांदेड महापालिकेच्या 20 प्रभागांमध्ये एकूण 81 वॉर्ड आहेत. काही दिवसात नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी आपआपल्या पक्षाला रामराम ठोकुन भाजपाची वाट धरलेली आहे. यात पक्षाचे प्रमुख सुध्दा मागे नाही आहे. हा नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला धक्का असून शिवसेनेलाही मोठा धक्का बसला आहे. या फोडाफोडीच्या राजकारणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.