मुंबई : मुंबईतील एका 58 वर्षीय नर्सला अज्ञाताकडून दूरध्वनी आला, समोरच्याकडून त्या महिलेला तिच्या बँक खात्याची वैयक्तीक माहिती विचारून घेण्यात आली, त्यानंतर ताबडतोब त्या महिलेच्या बँक खात्यातून संबंधित व्यक्तीने परस्पर 23 हजार 520 रुपये काढून घेतले, त्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्यात अवघी 12 रुपये जमा रकम बाकी राहिली.
डि.एन. नगर पोलीस ठाण्यात संबंधित नर्सने तक्रार दाखल केली. या महिलेचे अंधेरी (प.) येथे राष्ट्रीय बँकेत खाते आहे. समोरच्या गुन्हेगाराला त्या महिलेच्या बँकेच्या खात्यासंबंधीची सविस्तर माहिती होती. त्यामुळे त्या व्यक्तीने संबंधित महिलेला फोन करून तिचा आधार कार्ड क्रमांक आणि डेबिट कार्डसंबंधीची माहिती विचारून घेतली. त्यानंतर त्या महिलेला ओटीपी क्रमांकही मिळाला. 29 जुलै रोजी त्या महिलेला तिच्या खात्यात केवळ 12 रुपये उरल्याचे दिसून आले. त्यावर त्या महिलेने ताबडतोब पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या विरोधात भादंवि संहितेनुसार 420 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.