पुणे- फोर्च्युन वास्तू शिल्प डेव्हेलपर्सतर्फे मकर संक्रांतीनिमित्त थेरगाव येथे हळदी कुंकू व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मकरंद पांडे आणि नितीन धिमधिमे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदी मराठी गीतांच्या बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला ओत. सादरीकरण क्रांती मळेगावकर यांनी केले. फोर्च्युन वास्तू शिल्प डेव्हेलपर्सतर्फे घरे खरेदी केलेल्या ग्राहक दाम्पत्यांचा मकरंद पांडे, नितीन धिमधिमे यांच्या हस्ते विशेष सन्मान झाला. कार्यक्रमाला अथर्व प्रॉपर्टीज डायरेक्टर संतोष दुबळे, उद्योजक विलास महाजन, रेखाताई भोळे यांच्यासह ग्राहक व गुंतवणूकदार उपस्थित होते.