फोर्बच्या नाविन्यता जपणाऱ्या कंपन्यांच्या यादीत भारतातील तीन कंपन्या

0

मुंबई : फोर्बच्या १०० सर्वाधिक नाविन्यता जपणाऱ्या कंपन्यांच्या यादीत हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंटस आणि भारती एअरटेल या कंपन्यानी स्थान मिळविले आहे. या यादी, सेल्सफोर्स डॉट कॉमने टेसला मोटर्स ला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.

फोर्बच्या यादीत युनिलिव्हर सातव्या, तर एशियन पेंटस नवव्या स्थानावर आहे. भारतीय एअरटेल ७८ व्या स्थानावर आहे. युनिलिव्हर आणि एशियन पेंटस या आधी ३२ व्या आणि १८ व्या स्थानावर होत्या. गेल्या वर्षी टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, सन फार्मा या कंपन्या या यादीत होत्या. फोर्बच्या यादीत क्रमांक मिळवण्यासाठी सात वर्षांची उलाढाल लक्षात घेतात. मार्केट कॅपिटलाझेशन १० अरब डॉलर इतके लागते. बँक, वित्त सेवा, उर्जा, उत्खनन कंपन्यांना या यादीसाठी विचारात घेतले जात नाही.