मुंबई। फोर्ब्सने नुकतीच आशियातील 30 वर्षाच्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताला ऑलिम्पिक मध्ये कुश्तीपदक मिळवून देणारी साक्षी मलिक हिच्यासोबत रिओ ऑलिम्पिक मध्ये जिम्नॅस्ट दीपा हिला सुध्दा स्थान मिळाले आहे.याचबरोबर बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट हिला सुध्दा या यादीत स्थान मिळाले आहे. खेळाचे मैदान गाजविणार्या दीपा कर्मारकर आणि साक्षी मलिकला देखील फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळाले आहे.
रिओ ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान पटकावत जागतिक पातळीवर दीपाने सर्वांची वाहवा मिळवली होती. दीपा ऑलिम्पिकमध्ये 52 वर्षांच्या कालावधीत सहभागी होणारी भारताची पहिली जिम्नॅस्ट ठरली होती. तर साक्षीने 58 किलो फ्रीस्टाईलमध्ये गेल्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावले होते. भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणारी ती पहिली महिला मल्ल ठरली होती.याच्यासह चुलबुली, फनी, हॉट आणि बॉलिवूडची बबली गर्ल आलिया भट्टचा समावेश फोर्ब्सने नुकत्याच जारी केलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत झाला आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या आशियातील 30 वर्षाच्या सेलिब्रिटींच्या यादीत आलियाने स्थान मिळवले आहे. आलियाने स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले. यानंतर तिने आतापर्यंत जवळपास 10 चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारत आपल्यातील अभिनय
दाखवून दिला आहे.