फोर्ब्स म्हणते, देशातील 73 टक्के जनतेचा मोदींवर भरवसा

0

नवी दिल्ली – जगातील सर्वात विश्वासार्ह सरकारमध्ये भारत अव्वल स्थानी आहे. लोकशाही असलेल्या जगातील प्रमुख 34 देशांमध्ये सरकारविषयी लोकांमध्ये असलेल्या विश्वासाबद्दल जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने सर्वेक्षण केले आहे. भारताने यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. भारतीय जनतेचा देशातील सरकारवर जगातील इतर देशांमधील लोकांच्या तुलनेत अधिक विश्वास असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मोदी सरकारवर देशातील 73% जनतेचा विश्वास असल्याची आकडेवारी सर्वेक्षणातून पुढे आली आहे. फोर्ब्स मासिकाकडून याबद्दलचे ट्विट करण्यात आले.

जगातील 34 देशांमधील स्थितीचा आढावा फोर्ब्स मासिकाकडून घेण्यात आला आहे. सरकारबद्दल लोकांच्या मनात असलेल्या विश्वासाची पडताळणी सर्वेक्षणातून करण्यात आली. भारताने यामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. देशातील 73 टक्के नागरिकांचा सरकारवर विश्वास आहे. अमेरिका, रशिया, ब्रिटन, जर्मनी यासारख्या देशांना मागे टाकत भारताने पहिले स्थान पटकावले आहे. फोर्ब्स मासिकाने एका ट्विटच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली आहे. मात्र, फोर्ब्सच्या या सर्वेक्षणाची अनेकांनी खिल्ली उडवली आहे.

मोदी सरकारवर जनता खूष
सध्या केंद्रात असलेल्या मोदी सरकारच्या कामकाजावावर देशातील जनता खूष असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटकडून जारी करण्यात आलेल्या एका रिपोर्टमध्ये 15 देशांची नावे देण्यात आली आहेत. या यादीत भारत प्रथम क्रमांकावर आहे. आर्थिक सहकार्य आणि विकास संस्थेत समावेश होणार्‍या देशांचे फोर्ब्सकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये लोकशाही असलेल्या 34 देशांचा समावेश असून या संस्थेतील देश एकमेकांची मदत करतात. यासोबतच या संस्थेशी 70 हून अधिक बिगरसदस्यीय अर्थव्यवस्था जोडल्या गेलेल्या आहेत.

अमेरिकेत सरकारवर 30 टक्के विश्वास
या यादीनुसार, भारत प्रथम क्रमांकावर, कॅनडा दुसर्‍या तर, रशिया आणि तुर्कस्थान तिसर्‍या स्थानावर आहेत. भारताच्या सर्वाधिक 73 टक्के लोकांनी देशाच्या सरकारवर विश्वास दाखवला आहे. तर कॅनडातील 62 टक्के लोकांचा सरकारवर विश्वास आहे. तुर्कस्थान आणि रशियाला या दोन्ही देशातील 58 टक्के लोकांनी सरकारवर विश्वास दाखवला आहे. जर्मनीत 55 टक्के, तर दक्षिण आफ्रिकेत 48 टक्के लोकांनी सरकारच्या कारभारावर विश्वास ठेवला आहे. ऑस्टेलियातील 45 टक्के लोकांनी ऑस्ट्रेलिया सरकारव भरोसा दाखवला आहे. 41 टक्के लोकांचा ब्रिटन सरकारवर विश्वास आहे. जपानमध्ये फक्त 36 टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर खूष आहेत. तर, अमेरिकेत फक्त 30 टक्के लोकांनी सरकारवर विश्वास दाखवला आहे.