भुसावळ- राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगर समोर राख भरण्यासाठी उभ्या राहणार्या बल्कर महामार्गावरून बाजूला करीत असताना तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानन करेवाड यांना मारहाण झाल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजता घडली होती. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, अटकेतील अमन जगबीदर सुनसोये (26, रा.निंभोरा, ता. भुसावळ) आणि कुलदिप एकनाथ महाले (34, रा. रा. समता नगर, रेल्वे हॉस्पीटलमागे, भुसावळ) यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली.
सात बल्कर चालकांवर दंडात्मक कारवाई
दीपनगरसमोर उभ्या असलेल्या सात बल्कर वाहनांना जप्त केल्यानंतर मंगळवारी भुसावळ न्यायालयात याबाबत दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर करण्यात आले. रस्त्यात वाहने लावून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी प्रत्येक चालकाला 200 रुपये दंड सुनावण्यात आल्याचे तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले.