फ्रान्सचे स्टेफनी महिला बॉक्सर्सचे कोच

0

नवी दिल्ली । बॉक्सिंग महासंघाने एआयबीएच्या थ्रीस्टार कोच फ्रान्सच्या स्टेफनी कोट्टालोरडा यांची पुढील दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. स्टेफनी यांच्या रूपाने भारतीय महिला बॉक्सर्सना पहिल्यांदा विदेशी कोच मिळाला आहे. युरोपियन बॉक्सिंग परिसंघाच्या कोचेस आयोगाच्या सदस्य 41 वर्षांच्या स्टेफनी जूनच्या पहिल्या आठवड्यात खेळाडूंसोबत जुळतील. इटलीची रफेले बर्गामास्को डिसेंबर 2020 पर्यंत युवा महिला संघाची कोच असेल. अलीकडेच नियुक्त झालेले पुरुष संघाचे कोच सँटियागो निवा यांचा कार्यकाळ डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला. ’ तिन्ही कोचेसच्या नियुक्तीला काल साईसोबत झालेल्या बैठकीत मूर्त रूप देण्यात आले. भारताच्या कोचिंग स्तरावर स्थिरता आणण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या लाभदायी ठरतील’, असे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले आहे.