फ्रान्सच्या ओडेक्स संस्थेतर्फे डॉ.हिरानी व मराठेंना पदक

0

जळगाव। जळगाव रनर्स ग्रुपचे सदस्य डॉ.रवि हिरानी व उद्योजक स्वप्निल मराठे यांना अल्ट्रासायकलिंग स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल फ्रान्सच्या ओडेक्स तर्फे पदक प्रदान करण्यात आले.

धुळे सायकलिस्टचे पराग पाटील यांनी पदक दिले. त्यांनी धुळे-नासिक-धुळे-शिरपुर-धुळे हे 400 किमीची बी.आर.एम केवळ 25 तासात पूर्ण केले. त्यांचा यशात अ‍ॅड. आनंद परांजपे, किरण बच्छाव, विक्रांत सराफ, उमेश महाजन,डॉ.विवेक पाटील, निलेश भांडारकर,अविनाश काबरा तसेच पत्नी, भाऊ आणि कुटुंबियांचा खूप मोठा वाटा आहे.