फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा

0

पॅरीस (वृत्तसंस्था) – फ्रान्समध्ये पुढील वर्षी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत उतरण्यासाठीच फ्रान्सचे पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी राजीनामा दिला. सोशलिस्ट पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून मॅन्युअल वॉल्स हे उभे राहणार आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या वॉल्स यांनी सोमवारी राष्ट्रपतीपदासाठी आपली उमेदवारीची घोषणा केली होती. मंगळवारी सकाळी त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.

फ्रान्सचे विद्यमान राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी वॉल्स यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधानपदासाठी बर्नार्ड केजेनूव यांचं नाव सुचवल्याचे वृत्त आहे. वॉल्स यांच्या उत्तराधिकार्‍याला सहा महिन्यांत पदभार सांभाळावा लागणार आहे.