पॅरिस : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतीत युवा खेळाडूचा पुरस्कार जिंकणाऱ्या फ्रान्सच्या खेळाडूने आज अविस्मरणीय कामगिरी केली. विश्वविजेत्या फ्रान्स संघातील कायलिन मॅबाप्पेने अवघ्या 13 मिनिटांत 4 गोल करताना एक विक्रम नावावर केला. पॅरिस सेंट जर्मेन क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मॅबाप्पेने ( 19 वर्ष व 9 महिने) या कामिगीरसह लीग 1 स्पर्धेत चार गोल करणाऱ्या युवा खेळाडूचा मान पटकावला.
त्याच्या या कामगिरीच्या जोरावर पॅरिस सेंट-जर्मेनने लीग 1 स्पर्धेत लियॉन क्लबवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवताना 82 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला. लीग 1 स्पर्धेतील पॅरिस सेंट जर्मेनचा हा सलग नववा विजय ठरला. त्यांनी यासह ऑलिम्पिक्यू लिलॉईस यांनी 1936-37 मध्ये नोंदवलेला सलग आठ विजयांचा विक्रम मोडला.
पहिल्या सत्रात नेयमारने (9 मि.) पेनल्टी स्पॉट किकवर पॅरिस सेंट जर्मेन क्लबला आघाडी मिळवून दिली होती. त्यात मॅबाप्पेने दुसऱ्या सत्रात चार गोल्सची भर घातली. त्याने अवघ्या आठ मिनिटांत ( 61, 66 व 69 मि.) हॅटट्रिक पूर्ण केली. पाच मिनिटानंतर त्यात आणखी एका गोलची भर घातली.