फ्लिपकार्टचे ऑफिस फोडले, चोरीविना चोरटे झाले पसार

0

भुसावळ । शहरातील जळगाव रोडवरील लोणारी मंगल कार्यालयाशेजारी असलेल्या फ्लिपकार्ट या खाजगी कंपनीच्या कार्यालयाचे शटर व इलेक्ट्रॉनिक तिजोरी तोडून चोरट्यांनी धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न केला असला तरी रक्कम व मुद्देमाल न लांबवताच चोरटे पसार झाल्याची घटना 9 रोजी मध्यरात्री घडली.

या प्रकाराने शहर पोलीसही चक्रावले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार या कार्यालयात बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये चोरट्यांची छबी कैद झाल्याने त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. कार्यालयाचे शटर तोडून चोरट्यांनी डीजीटल तिजोरीचे लॉक तोडले असले तरी त्यातील रक्कम व अन्य कार्यालयातील साहित्य लांबवले का नाही? असा प्रश्‍नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. याप्रकरणी संदीप देविदास सुर्यवंशी (हनुमाननगर) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.