फ्लिपकार्टवरून ऑनलाईन तलवारींची खरेदी

0

औरंगाबादेत पकडला जोरदार खळबळ

औरंगाबाद । औरंगाबाद येथील पोलिसांच्या गुन्हे शाखेने सोमवारी रात्री नागेश्‍वरवाडी आणि जय भवानी चौक या दोन ठिकाणी छापे मारून तलवारीचा साठा जप्त केला आहे. या तलवारींची खरेदी फ्लिफकार्टवरून ऑनलाईन झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकारणामुळे जोरदार खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये 10 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मंगळवारी, नवे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद हे पदभार स्वीकारणार आहेत, त्यांना ही सलामी ठरावी या उद्देशाने ही थेट कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत बारा तलवारी, तेरा चाकू, एक गुप्ती, एक कुकरी पोलिसांनी ताब्यात घेतली. खेळण्यांच्या नावावर त्यांनी ही हत्यारे मागवली होती.