नंदुरबार । छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत शासनाच्या निर्णयाप्रमाणे कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. या निकषाप्रमाणे जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांना बि-बियाणे, खते, औषधे खरेदी करण्यासाठी बँकानी तातडीचे 10 हजार रुपयाचे पीक कर्ज शेतकर्यांना वितरीत करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या आहेत.जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात नुकतीच बँक अधिकार्यांची बैठक घेण्यात आली होती त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कल्लशेट्टी, बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा अग्रणी बॅकेचे व्यवस्थापक एस. एस. धामणकर, जिल्हा उपनिबंधक, एस. वाय. पुरी, नाबार्डचे डी. डी. एम. राजेश चांदेकर, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे विभागीय अधिकारी डी. बी. पवार, संजय देशपांडे, विशाल तेंलग, संदीप वळवी, के. बी. पानपाटील, एम. ए. गायकवाड, कुमार गौरव, सचिन शिंदे, बी. आर. भेाई, टी. के. गावीत, बी.टी. लिंगायत आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी बोलतांना म्हणाले, 14 जुलैच्या शासन निर्णयाची प्रत्येक बँकेने अंमलबजावणी करावी. तातडीच्या 10 हजार रुपयाचे कर्ज वाटप करतानां जे पात्र शेतकरी 30 जून, 2016 पर्यत थकबाकीदार आहेत. अशा पात्र शेतकर्यांना 31 ऑगस्ट 2017 पर्यंत तातडीचे पीक कर्ज वाटपास मुदतवाढ देण्यात आली आहे.