बँकांनी सक्तीची कर्जवसुली करू नये: काळजीवाहू सरकारचे आदेश

0

मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानी संदर्भात मदत देण्याच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी काळजीवाहू सरकारमधील पालकमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा झाली. बँकांना सक्तीची कर्जवसुली न करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सत्ता स्थापनेपेक्षा शेतकऱ्यांना मदत देण्याचा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा असून शेतकरी आजच्या बैठकीच्या केंद्रस्थानी होते असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आजच्या बैठकीत सत्तास्थापनेबाबत कोणतेही चर्चा झाली नाही असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्यात नुकसानीचा पंचनामा जवळपास पूर्ण होत आला असून ७० लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत चर्चा झाली असून लवकरच मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना २-३ रुपये किलोने धान्य देण्याबाबत देखील चर्चा झाली आहे.