बँकाबाहेर भूलथापा देऊन रोकड लंपास करणारी टोळी सक्रिय

0

कल्याण : कल्याण डोंबिवलीत बँकाबाहेर बँकेतून रोकड घेऊन येणार्या नागरिकांना भूलथापा देत त्यांच्याजवळील रोकड लंपास करणार्‍या एका चोरट्याला काल बाजारपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे या घटनांना आळा बसेल असे वाटत असतानाच काल डोंबिवलीत एका बँकेबाहेरच दोन जणांना भूलथापा एकूण त्याच्याजवळील एकूण 1 लाख 96 हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

लाखो रुपये घेवून पोबारा
डोंबिवली पूर्वेकडील संत नामदेव पथ अंबिकानगर परिसरात राहणारे अर्जुन सावंत आपल्या मालकाचे 1 लाख रुपयांची रोकड घेऊन भानू नगर सिल्व्हर कॉईन येथील कॉर्पोरेशन बँकेत भरणा करण्यासाठी जात होते. भानू नगर परिसरात येथे पोहोचताच एका अज्ञात इसमाने त्यांना हटकले, मला शेठचे दीड लाख रुपये देणे आहे शेठ मला ओळखतो अशी थाप देत बोलण्यात गुंतवून सावंत यांच्याजवळील 1 लाख रुपये घेत तुला अडीच लाख देतो, असे सांगत बोलण्यात गुंतवून एक लाख घेऊन पसार झाला. काही कालावधीने सावंत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी सावंत यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा
डोंबिवली पश्चिमेकडील शास्त्रीनगर परिसरात राहणारे रितेश शहा हा सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भानू नगर परिसरातील बँक ऑफ इंडिया या बँकेत पैशांचा भरणा करण्यासाठी जात बँकेच्या शाखेसमोर एका अज्ञात इसमाने त्यांना हटकले. बँकेत पैसे भरण्यासाठी कमिशन देतो अशी भूलथाप देत बोलण्यात गुंतवून त्यांच्या जवळील 96 हजार रोकड घेऊन पसार झाला. आपली फसणूक झाल्याचे लक्षता आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.